हप्ता भरण्यास सांगितल्याने कर्जदाराने केला बजाज फायनान्सच्या मॅनेजरचा खून

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – थकित कर्जाचा हप्ता भरण्यास सांगितल्याचा राग आल्यामुळे ट्रक चालक कर्जदाराने बजाज फायनान्सच्या सेल्स मॅनेजरचा खून केला आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली.

रवींद्र प्रकाश वळकुंडे (वय 28) असे खून झालेल्या फायनान्स मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी राहुल लक्ष्मण गाढवे याला अटक केली आहे. अमोल भीमराव जोगदंड यांनी फिर्याद दिली आहे.

उरळीकांचन परिसरातील एका इमारतीत बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. आरोपी राहुल गाढवे ट्रकचालक असून त्याने बजाज फायनान्स मधून कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते भरावेत यासाठी मॅनेजर रवींद्र वळकुंडे यांनी राहूलकडे पाठपुरावा केला होता.

याच कारणावरून आरोपी राहूलने काल सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास बजाज फायनान्सच्या कार्यालयात जाउन फोनवर बोलत असलेले मॅनेजर रवींद्र वळकुंडे यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्याने रवींद्र यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here