संपत्तीच्या वादावरून मुलाने केली आईची हत्या

पाटणा (बिहार) – आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. संपत्तीच्या वादावरून एका माथेफिरू मुलाने आईची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडला आहे. हत्येनंतर आरोपी मुलाने पोलिसांना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली.

उर्मिला देवी असे मृत महिलेचे नाव आहे. उर्मिला देवी यांचे जावयाशी चांगले संबंध होते. त्याच्यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे आपल्या संपत्तीचा काही भाग आपल्या जावयाला त्या देऊ इच्छित होत्या. मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रंजन कुमारला आईचा निर्णय पटला नव्हता. जावयाला संपत्तीचा भाग देण्यासाठी तो विरोध करत होता. मात्र आई ऐकत नव्हती. त्यामुळे मुलगा आणि आईमध्ये वाद सुरू होते. संतापलेल्या मुलाने बुधवारी उर्मिला देवी गाढ झोपेत असताना त्यांची गळा दाबून निर्दयीपणे हत्या केली. त्यानंतर पोलिसांना फोन करून हत्या केल्याची कबुली दिली.

रंजन कुमार हा माथेफिरू होता तो गुन्हेगार वृत्तीचा असून तो याआधी कारावासात जाऊन आलेला आहे. त्यामुळे उर्मिला देवी यांना त्याच्यावर विश्वास नव्हता. या हत्येमुळे परिसरात खळबळ माजली असून लोकांची गर्दी झाली होती. आरोपी मुलांने पोलिसांना फोन करून बोलावले आणि सरेंडर केले. रंजन कुमार याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो नालंदा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here