दीया मिर्झाच्या लग्नाचे फोटो व्हायरल; महिला पुरोहिताची चर्चा

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलीवूड अभिनेत्री दीया मिर्झा आणि उद्योगपती वैभव रेखी हे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. दीया मिर्झाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यानंतर काही वेळातच व्हायरल झाले आहेत. फोटोमध्ये दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांच्या लूकसोबतच आणखी एका गोष्टीकडे नेटकऱ्यांचं लक्ष्य गेलं आहे. ते म्हणजे लग्नात एका महिलेने भटजींचं काम केलं.

लग्नाचा फोटो शेअर करताना दिशाने आपल्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये लिहिले आहे – प्रेम एक संपूर्ण चक्र आहे ज्याला आपण घर म्हणतो. त्याची हाक ऐकणं, त्यासाठी दरवाजे खुले करणं आणि मग त्याला भेटणं हे जादूसारखं आहे.

स्वत: संपूर्ण होण्याचा हा क्षण मी आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे… माझं कुटुंब मोठं झालं आहे. ईश्वर करो की प्रत्येक तुकड्याला त्याच्या पुरक तुकडा मिळो, सर्व हृदय जोडले जावे आणि प्रेमाची जादू आपल्या आजूबाजूला साकार होताना दिसू दे.’

फोटो मधील महिला भटजींकडे साऱ्यांचं लक्ष जात आहे. त्या स्वत: मंत्र म्हणून यज्ञात हवन करत आहेत.अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया देत त्यांचं कौतुक केलं आहे. दिया आणि वैभव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here