विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार? राज्यपाल कोश्यारी यांचे सरकारला पत्र

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची सूचना करणारे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पाठवले आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्चपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारला पत्र पाठवले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे त्यांनी कार्यभार सुपूर्द केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे राज्यपालांनी पत्रात नमूद केले आहे.

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा सदस्यांच्या नावांना राज्यपाल कोश्यारी यांनी अजूनही मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या जागा अजूनही रिक्तच आहेत. मात्र विधानसभा अध्यक्ष पदाच्या नियुक्तीबाबत राज्यपालांनी तातडीने विचारणा केल्याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here