नळावर पाणी भरण्याच्या वादातून अल्पवयीन मुलांनी केले तरुणावर वार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – लोहगाव येथील साठे वस्ती येथे नळावर पाणी भरताना झालेल्या वादातून दोन अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अनसुया हिरामण पवार (वय ३५) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार बालाजी ढोकळे, लक्ष्मी बालाजी ढोकळे यांच्यासह एका अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साठेवस्ती येथील सार्वजनिक पाण्याच्या नळावर अनुसया पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी पाणी भरण्याच्या कारणावरून बालाजी ढोकळे यांनी अनसुयाला शिवीगाळ केली. त्या वेळी स्थानिकांनी केलेल्या मध्यस्थीनंतर ही भांडणे मिटली; परंतु काही वेळाने अनसुया यांचा मुलगा योगेश घरासमोर उभा असताना ढोकळे यांचा अल्पवयीन मुलगा तेथे आला. त्याने कोयत्याने योगेशच्या डोक्यात आणि मानेवर वार केले. यात योगेश गंभीर जखमी झाला. अनसुया भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत असता त्यांनाही आरोपींनी दांडक्याने मारहाण केली. या प्रकरणी विमानतळ पोलिस तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here