पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – शहरात वाहनांची तोडफोड व जाळपोळीचे सत्र सुरू आहे. बिबवेवाडी परिसरातील सुपर शिवतेज मित्र मंडळाजवळ पार्क करण्यात आलेल्या तीन रिक्षांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महंमद अफजल फारूक अन्सारी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी लोखंडी हत्याराने रस्त्याच्या कडेला पार्क असलेल्या तीन रिक्षांच्या काचा फोडल्या. हातातील लोखंडी हत्यार हवेत फिरवून ‘माझ्या भावाला कोणी मारहाण केली, त्याच्याकडे बघून घेतो,’ असे म्हणून परिसरात आरडाओरडा करून दहशत निर्माण केली.






