अहमदाबाद – गुजरातमधील अरवली जिल्ह्यातील ही घटना आहे. गुजरातमध्ये दारूबंदी आहे. तरी बेकायदेशीरपणे दारूचा व्यवसाय होतो. आता पोलिसांनीच दारू लपवून ठेवल्याचे समोर आले आहे.
अरवली जिल्ह्यातील दोन पोलीस गाडीने जात होते. तेव्हा त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या गाडीत 120 लिटर दारू आढळली. नंतर पोलिसांनी या प्रकरणी खोलवर तपास केला असता त्यात दोन पोलीस अधिकारी नाही तर तीन पोलीस अधिकारी असल्याचे समजले.
इतकेच नाही तर तीन पोलीस अधिकार्यांनी मिळून अजून 70 लिटर दारू पोलीस स्थानकातच लपवली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.






