पुणे पोलिसांना आव्हान देत गुंड गजानन मारणे फरार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पुण्यात कुख्यात गुंड गजानन मारणे हा सध्या शहरात चर्चेचा विषय आहे. तळोजा जेलमधील सुटकेनंतर मारणे समर्थकांनी काढलेल्या मिरवणुकीमुळे अनेकांना उत्तर प्रदेश, बिहारची आठवण झाली आणि प्रशासनावर टीकेची झोड उठली. हे प्रकरण ताजे असतानाच आता गजानन मारणे हा फरारही झाल्याने पुणे पोलिसांची चांगलीच अडचण झाली. या सगळ्यामुळेच पोलीस आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुंड गजानन मारणे याचं साम्राज्य उद्धवस्त करणार असल्याची घोषणा केली आहे. पोलिसांनी असं आक्रमक रूप धारण केल्यामुळे मारणे याच्या मनात चांगलीच धडकी भरली असणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

गुंड गजा मारणेचं गुन्हेगारी साम्राज्य समूळ उद्धवस्त करणार, असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.गजानन मारणे हा पोलिसांच्या नाकावर टिच्चून फरार झाल्यामुळे आगामी काळात त्याच्यावर कठोर कारवाई करत शहरातील दहशत संपवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here