बलुचिस्तानात पाकिस्तानी लष्करावर मोठा हल्ला; पाच जवानांचा मृत्यू

इस्लामाबाद – बलुचिस्तान प्रातांत पाकिस्तानी लष्कराच्या जवानांवर दहशकतवादी हल्ला (Terrorist attack) करण्यात आला आहे. बलुचिस्तानातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला असून पाकिस्तान लष्कराची मोठी जीवितहानी झाल्याची बातमी समोर आली आहे. दोन्ही ठिकाणी झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराला निशाणा बनवण्यात आलं आहे. यामध्ये पाकिस्तान लष्कराचे पाच जवान मृत्यूमुखी पडले असून दोन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत.

बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटाचा बाहेरील परिसर आणि कोहलु जिल्ह्यातील दूरदराज परिसरात हा हल्ला करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी पाकिस्तानच्या फ्रंटियर कोरच्या सैनिकांना लक्ष्य करण्यात आलं आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलुचिस्तानच्या बाहेरील परिसरात झालेल्या हल्ल्यात रिमोट नियंत्रित बॉम्बचा वार करण्यात आला होता. हा बॉम्ब मोटारसायकलमध्ये ठेवून फ्रंटियर कोरच्या जवानांना टार्गेट करण्यात आलं. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या एका जवानाला प्राण गमवावा लागला तर अन्य दोघं गंभीर जखमी झाले आहेत.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दुसरा हल्ला कोहलु जिल्ह्यातील कहान परिसरात झाला. ज्यामध्ये आतंकवाद्यांनी फ्रंटियर कोरच्या तपास चौकीला लक्ष्य केलं होतं. ज्यामध्ये चार सैनिकांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत ही अंधाधुंद फायरिंग सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here