शिरसोली येथे एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागन

corona-test

जळगाव – शिरसोली प्र. बो. मध्ये विवाह सोहळ्यानंतर नवरदेवासह वडील, भाऊ, भावजाई आणि अन्य एक नातेवाईक असे लग्नघरातील पाच जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. शिरसोलीत दोनच दिवसात सात बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जळगावात १६ फेब्रुवारीला विवाह सोहळा आटोपल्यानंतर नवरदेवासह नातेवाईकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी तपासणी केली असता, पाच जण बाधित आढळून आले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here