मुंबई – कल्याणच्या सापर्डे गावात रविवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास हळदी समारंभ सुरु असताना अज्ञातांनी घरात घुसून तिघांवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले आहेत.
मयत झालेल्या महिलेनेचे नाव सुवर्णा चिंतामण घोडे असे असून जखमी झालेल्यांची नावे भारती जगदीश म्हात्रे आणि पवन जगदीश म्हात्रे अशी आहेत. जखमी असलेल्या दोघांना खाजगी रुग्णालत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, आरोपींचा
कसून शोध घेत आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली. हा हल्ला लुट करण्याच्या उद्देशाने करण्यात आली की, या मागे इतर काही कारणे आहेत. या दिशेने सुद्धा पोलीस तपास करत आहेत. अशी माहिती सुद्धा पोलिसांनी दिली आहे.







