पुणे – पुण्याचा रहिवासी असलेल्या २२ वर्षाच्या समीर गायकवाडने राहत्या घरी साडीने
गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. समीर हा मराठी इन्स्टाग्रामचा स्टार होता. गेल्या काही महिन्यात तो इन्स्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय झाला होता. तो एक नावाजलेला चेहरा होता. विविध व्हिडीओच्या माध्यमातून तो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. तरुणांना आवडणाऱ्या स्टाईलमध्ये समीर वैचारिक संदेश पोहचवण्याचे काम करत असे. त्याची हि कला सर्वाना आवडत देखील होती.
समीर गायकवाड हा पुण्याच्या वाघोली येथील केसनंद रोडवरील निकासा सोसायटीत राहायला होता. या आपल्या घरातचं त्याने गळफास लावून आत्महत्या केली. समीरच्या आत्महत्येची बातमी समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना याच्यावर विश्वासचं बसत नाहीय. रविवारी पाच वाजण्याच्या सुमारास समीरने आत्महत्या केली. समीरचा भाऊ प्रफुल्लने या घटनेची माहिती लोणकंद पोलीसांना दिली.
समीरला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहून कुटुंबियांना धक्का बसला. तातडीने
समीरला खालू उतरवून जवळच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. समीरच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. समीरच्या रुममध्ये किंवा खिशामध्ये कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, असं पोलीसांनी बुलंद पोलीस टाईम्सशी बोलताना सांगितले आहे. पोलीस समीरने का आत्महत्या केली याचा कसून तपास करत आहे.






