मुंबई – महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ राज्यात पुन्हा एकादा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. त्याचा धसका घेत मुंबईच्या शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. आज एक हजार अंकांनी निर्देशांक घसरला. तर निफ्टी २८० अंकांनी कोसळला. सोमवारी सकाळी शेअर बाजार उघडताचं विक्रीचा सपाटा पाहायला मिळाला. आताच्या घडीला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक एक हजार १७ अंकांच्या घसरणीसह ४९ हजार ८६८.९२ अंकांवर आला आहे. तर निफ्टी निर्देशांक २७२ अंकांच्या घसरणीसह १४ हजार ७१०.१५ अंकांवर आला आहे.
संपूर्ण देशात नोव्हेंबर महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट गहिरे होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रात खबरदारीचा उपाय म्हणून काही ठिकाणी लॉकडाउन आणि नाईट कर्फ्युचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या भीतीने बाजारात खळबळ माजली आहे. दिवसेंदिवस शेअर मार्केटच्या निर्देशांकात घट पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर
बाजारात ३० पैकी २७ शेअर घसरले आहेत.






