पिंपरी-चिंचवडमधील घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांच्या बेड्या

पुणे – पिंपरी-चिंचवडमधील घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील सांगवी परिसरातून घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हे सर्व आरोपी सांगवी परिसरातील भैरवनाथ गॅस एजन्सीमधील कर्मचारी असून एकून 22 जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडून 14 टेम्पोमध्ये 312 गॅसच्या भरलेल्या आणि रिकाम्या टाक्या सामाजिक सुरक्षा पथकाने ताब्यात घेतल्या आहेत.

ताब्यात घेतलेल्या टोळीकडून अंदाजे 312 घरगुती गॅस हस्तगत केले आहेत. मुख्य गोडाऊनमधून इतर दुसऱ्या गोडाऊनमध्ये गॅस सिलेंडर घेऊन जाऊन तिथे कनेक्टरच्या साहाय्याने एका गॅस मधून एक ते दोन किलो गॅस दुसऱ्या मोकळ्या गॅस सिलेंडरमध्ये काढून घेत असत. असं करत पुन्हा, ते गॅस ग्राहकांना विकायचे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here