नाशिकमध्ये नाईट कर्फ्यू, रुग्णसंख्याही वाढली

corona-case-high

नाशिक –  संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना नाशिकमध्येही कोरोनाचे अधिक संख्येने रुग्ण मिळत आहेत. काल एकाच दिवसांत (सोमवार) शहरात 224 कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे नाशिककरांची धाकधूक वाढली आहे.

नाशिकमध्ये कोरोनाची स्थिती काय?

काल सोमवारी एकाच दिवशी नाशिकमध्ये 224 रुग्ण मिळाले. गेल्या काही दिवसांतली ही मोठी वाढ आहे. त्यामुळे सध्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही जवळपास 2 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये सध्या 1941 रुग्ण उपचार घेत आहेत.

शहरात नाईट कर्फ्युची कडक अंमलबजावणी

नाशिक शहरात कोरोनाचं संक्रमण वाढलं आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांचं प्रमाण वाढतं आहे. असं असलं तरी सध्या शहरात लॉकडाऊन लावणार नाही मात्र कठोर निर्बंध लावणार लावले गेले आहेत. शहरात नाईट कर्फ्यूची कडक अंमलबजावणी सुरु झाली आहे.

शहर पोलिसांकडून शहरात मध्यरात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. रात्री 11 नंतर घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येतीय. अत्यावशक सेवा वगळून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई येत आहे. शहराच्या सातपूर, सिडको, पंचवटी, नाशिक रोड, द्वारका भागात नाकाबंदी करत पोलीस कारवाई करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here