पुणे – कोल्हापूरचे माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. याप्रकरणी धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लक्ष्मी लॉन्सचे विवेक मगर यांच्यासह तिघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्स येथे काल (रविवार 21 फेब्रुवारी) पार पडला होता. याबाबत मंगल कार्यालयाच्या चालकाला नोटीस देण्यात आली होती. कोरोनासंबंधी नवे नियम आजपासून (सोमवार 22 फेब्रुवारी) लागू होणार असले तरी आधीच्या नियमावलीनुसार शंभर जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडण्याचे बंधन होते. मात्र या सोहळ्याला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
याप्रकरणी धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच लक्ष्मी लॉन्सचे विवेक मगर यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






