प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकराने निवडला चुकीचा रस्ता…आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला…

गोरखपूर (उत्तर प्रदेश) – येथील पोलिसांनी एका टोळक्याला अटक केली आहे. प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पैशांची गरज होती म्हणून मुख्य आरोपी असलेल्या प्रियकराने चुकीचा रस्ता निवडला. गोरखपूरच्या एका मेडीकल दुकानाच्या मालकाला लुटल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात आत्तापर्यंत ३ जणांना पकडण्यात आले आहे.

१० फेब्रुवारीला या सर्वांनी मेडिकल फोडले होते. एका पुलावर ४ जणांनी मेडिकलच्या मालकाला घेरुन त्याला मारहाण केली. त्याच्याकडून बाईक, मोबाईल आणि रुपये लुटले. आणि पोबारा केला. या प्रकरणानंतर मुख्य आरोपी आपल्या प्रेयसीसोबत पळून जाण्यात यशस्वी झाला. दुकानदार बेशुद्ध झाल्यावर आरोपी पळून गेले. दुकानदार शुद्धीवर आल्यावर त्याने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

या प्रकरणात पोलिसांना सुरवातीला मोठे यश मिळाले. या टोळीच्या ३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना ही एक लव्ह स्टोरी असल्याचे समजले. मिर्झापूरला राहणारा दिनेश हा या टोळीचा मुख्य सुत्रधार होता. त्याने आपल्या प्रेयसीबरोबर पळून जाऊन लग्न करण्याचा प्लॅन बनवला होता. लग्नासाठी त्याला पैशांची गरज होती. त्याला झटपट पैसे हवे होते. यासाठी त्याने गुन्हेगारीचा मार्ग निवडला. यानंतर त्याने लुटलेली बाईक विकून ते पैसे घेऊन तो पसार झाला.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नसल्याचे सांगितले आहे. पोलिस जेव्हा या प्रकरणाचा तपास करत होते तेव्हा हे तीनही आरोपी त्या ठिकाणी हजर राहून पोलीसांच्या हालचालीवर लक्ष ठेवत होते. याचा पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेताचं सगळे सत्य समोर आले आणि या घटनेचा उलगडा झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here