साईबाबांच्या समाधी दर्शनाची वेळ बदलली, ठराविक वेळेत होणार दर्शन…

shirdi-saibaba

शिर्डी (प्रतिनिधी) – कोरोच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे शिर्डी देवस्थानाने साईबाबांच्या समाधी दर्शनांच्या वेळेत बदल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे साईभक्तांना सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेता येणार आहे. रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यत दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थानाने घेतला आहे. त्यामुळे रात्री ९ तास साई समाधी मंदिर साई भक्तांसाठी बंद असणार आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर देशासह विविध राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. तर मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिर्डी देवस्थानाने साईबाबांच्या समाधीच्या वेळत बदल केला आहे. नगर जिल्ह्यामध्ये रात्रीचा कर्फ्यू लावण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here