ऑर्डर रद्द केल्याच्या राग आल्याने डिलिव्हरी बॉयने हॉटेल मालकाला चोपले

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – जेवणाची ऑनलाईन ऑर्डर रद्द करून दुसऱ्या रायडरला बोलाविल्याच्या रागातून डिलिव्हरी बॉयने एका हॉटेल मालकाला बेदम मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार बाणेरमध्ये घडला आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 20 फेब्रुवारीला रात्री साडेआठ वाजता घडली.

रामेश्वर वाघाजी तडसे (वय 35) आणि त्याच्या साथीदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल विजय अग्रवाल (वय 40, बाणेर रोड ) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी विजय यांचे बाणेर परिसरात हॉटेल आहे. 20 फेब्रुवारीला एका ग्राहकाने झोमॅटो अ‍ॅपवरून त्यांच्या हॉटेलला जेवणाची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. त्यानुसार विजय यांनी जेवणाची ऑर्डर तयार करून झोमॅटो रायडर रामेश्वरला फोन केला. मात्र, रामेश्वरने विजयच्या फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे विशालने झोमॅटो हेल्पलाइनला फोन करून तुमचा रायडर आला नाही असे सांगितले. त्यामुळे कंपनीने दुसरा रायडर पाठवून दिला. त्याचवेळी रामेश्वर ऑर्डर घेण्यासाठी विजय यांच्या हॉटेलजवळ पोहचला. त्यानंतर रामेश्वरने विजयला माझी ऑर्डर कॅन्सल का केली असे मारहाण केली. त्याशिवाय त्यांच्या हॉटेलमधील म्युझिक लाईट तोडून नुकसान केले. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here