चोरट्यांनी कापडी पिशवी कापून सुभाष चौकात विवाहितेचे सव्वा लाखाचे दागिने लांबविले

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – शहरातील सुभाष चौकात दुकानातून विवाहितेने दागिणे खरेदी केले. यानंतर घराकडे परतत असतांना तिची कापडी पिशवी कापून त्यातील १ लाख २२ हजार रूपये किंमतीचे दागिणे लांबविल्याची घटना आज समोर आली आहे.

याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, शहारातील पारख नगर येथील माहेर असलेल्या माला राकेशकुमार मालानी (वय-५३) रा. कालानीनगर, इंदौर मध्यप्रदेश ह्या जळगाव येथे भावाकडे भेटण्यासाठी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी आल्या. दुपारी ४ वाजता माला मालानी ह्या त्यांच्या भावजायीसोबत सुभाष चौकातील आरसी बाफना नयनतारा ज्वेलर्स येथे त्यांनी १ लाख २२ हजार ८०९ रूपये किंमतीचे ब्रासलेट व कानातील टॉप्स असे सोन्याचे दागिने खरेदी केले.

त्यानंतर सिल्वर शोरूम येथे दुपारी ४.४५ वाजता पोहचले. दुकानावर पोहचताच त्यांना पिशवीत दागिने पाहिले असता अज्ञात चोरट्यांनी पिशवी कापून सोन्याचे दागिने लंपास केल्याचे दिसून आले. विवाहितेच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अभिजित सैंदाणे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here