ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवक सुरेंद्र यादव याने एका मतदारांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदान न केल्याच्या रागातून हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.
अंबरनाथ पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 8 मधील मतदारांची नावे ही 9 मध्ये आल्याने याबाबत पालिकेचे अधिकाऱ्यांना लक्ष्मण यादव आणि बिरव यादव सांगत होते. मात्र, तुमची नावे तिथेच राहतील तुम्ही मला मतदान करत नाही’ असे म्हणत काँग्रेस माजी नगरसेवक सुरेंद्र यादव याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी दोघांवर लाठी काठीने जीवघेणा हल्ला केला. सुरेंद्र यादव याने दोघांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात लक्ष्मण आणि बिरव यादव गंभीर झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या नगरसेवकावर आधीच अनेक गंभीर गुन्हे असल्याने तो तडीपार देखील होता. अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीत मतदारांवर दबाव टाकण्याच्या आणि दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याने केल्याचे जखमींचे म्हणणे आहे.या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.






