ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – डोंबिवलीमध्ये कुत्रा चावल्याच्या रागातून एका तरुणाने कुत्र्याला जीवे मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अजय याला अटक केली आहे.
डोंबिवली पश्चिमेतील कोपर रोड येथील मिनाताई उद्यानाची देखभालीचे काम गेल्या चार वर्षापासून अजय नायडू हे करीत आहेत. उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी शेरु नावाचा कुत्राही पाळला होता. उद्यान बंद केल्यानंतर नायडू हे शेरुला उद्यानात मोकळे सोडीत असत.
19 फेब्रुवारीला दुपारी 2.30 च्या सुमारास अजय मगरे हा दारू पिऊन गार्डनजवळ आला असता नायडू यांनी त्याला उद्यान बंद झाले असल्याचे सांगितले. परंतु, अजयने ते न ऐकता भिंतीवरुन उडी मारुन उद्यानाच्या आत गेला. त्याच वेळी शेरुने अजयच्या हाताला चावा घेतला. त्यानंतर रागाच्या भरात तरुणाने कुत्राला ठार मारले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






