मसाज पार्लरच्या आडून सुरू होतं सेक्स रॅकेट

इंदौर येथे २ विदेशी तरुणींसह २४ जणांना अटक

इंदौर (मध्यप्रदेश) – येथे पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. मसाज पार्लरच्या आडून सेक्स रॅकेट सुरू होते. पोलिसांनी छापा टाकून आक्षेपार्ह अवस्थेत १३ तरुणी आणि ११ तरुणांना अटक केली. खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

इंदूर पोलिसांनी मसाज पार्लरमधून १३ तरुणी आणि ११ तरुणांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. अटक केलेल्यांमध्ये दोन विदेशी तरूणी आहेत. त्या थायलंडच्या असल्याचे सांगण्यात येत आहे. अटक केलेल्या सर्वांना महिला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मसाज पार्लरचा संचालक घटनास्थळावरून पसार झाला.

मसाज पार्लर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच होते. या पार्लरमध्ये सेक्स रॅकेट सुरू होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना खबऱ्यांमार्फत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर क्राइम ब्रँच आणि महिला पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मसाज पार्लरवर छापे मारले. पोलिसांनी पार्लरमधून १३ तरुणी आणि ११ तरुणांना ताब्यात घेतले. तिथे बऱ्याच आक्षेपार्ह वस्तूही सापडल्या. जप्त केलेल्या मोबाइलमधून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. या टोळीत थायलंडच्या तरुणीही सामील होत्या. त्यांना अटक करून चौकशी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here