जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीचे न्यायाधीशांसमोरच कोर्टातच विषप्राशन

रीवा (मध्यप्रदेश) – हत्या प्रकरणात कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावताच, आरोपीने न्यायाधीशांसमोरच विष प्राशन केले. या प्रकरणानंतर कोर्टात खळबळ उडाली. त्यानंतर त्याला रीवा येथील संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीने कोर्टातच विष प्राशन केले. त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला तातडीने रीवा येथील संजय गांधी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याचा मृत्यू झाला. पन्ना जिल्हा कोर्टात हा प्रकार घडला. सोमवारी आरोपी अनिल शिवहरे याला हत्या प्रकरणात कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीने लगेच खिशात आणलेले विष बाहेर काढून प्यायले. त्यानंतर कोर्टात एकच गोंधळ उडाला.

आरोपीला तात्काळ उपचारासाठी पन्ना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती बिघडल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला संजय गांधी रुग्णालयात नेले. दोन तासांनंतर त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. कोर्ट परिसरात आरोपीची झडती घ्यायला हवी. मात्र, असे झाले नाही. त्यामुळे आरोपीला सोबत विष घेऊन जाता आले. ते प्यायल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here