दिल्लीतील फाइव्हस्टार हॉटेलमध्ये मॉडेलवर बलात्कार

नवी दिल्ली – येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका मॉडेलवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना दिल्लीच्या चाणक्यपुरी परिसरात घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

दिल्ली येथील चाणक्यपुरी परिसरात ही घटना घडली आहे. एका 22 वर्षाची तरुणी मॉडेलिंग करते. 30 जानेवारी रोजी तिच्या जुन्या मित्राने तरुणीला मेसेज केला होता की एकाच्या लग्नानिमित्त तो दिल्लीत येत आहे. तेव्हा आपण भेटू असे तो म्हणाला होता. आरोपी आपल्या वडील आणि एका दूरच्या नातेवाईकासोबत दिल्लीला आला होता. तिथे तो सगळ्यांसोबत थांबला होता.

त्यानंतर 20 फेब्रुवारीला सकाळी 5 वाजता तिच्या मित्राने मेसेज केला आणि भेटण्यासाठी मित्राच्या घरी बोलावले. मात्र तरुणीने त्याला नकार दिला. त्यानंतर त्याने तिला खान मार्केटमध्ये भेटायला बोलावले. जुना मित्र असल्याने तरुणी त्याला खान मार्केटला भेटायला गेली. तिथे त्यांनी एकत्र नाश्ता केला. त्यानंतर तो मित्र तिला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने एक वेगळी रुम बुक केली आणि तरुणीला त्या रुममध्ये घेऊन गेला. तिथे गेल्यावर चुकीच्या पद्धतीने तिला स्पर्श करायला लागला. तिने विरोध केल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच याची कुठे वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली.

या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने हिंमत एकवटून पोलिस ठाणे गाठले. तिने दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. दक्षिण मुंबईचा हा तरुण असून त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून तरुणीची वैद्यकीय चाचणी केली आहे. तिचा जबाबबही घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here