अहमदनगर (प्रतिनिधी कृष्णा साठे) – भारतात बिडी ऊद्योगात सुमारे 4.5 कोटी कामगार (बिडी रोलर्स, पॅकर्स चेकर्स, तंबाखू पिकवणारे शेतकरी, शेतमजुर ,बीडी पानं तोडणी कामगार) कार्यरत आहेत. या मध्ये 85 लाखांपेक्षा जास्त बिडी वळण्याचे काम प्रामुख्याने महिला कामगार काम करित आहेत. हे सर्व कामगार बिडी ऊद्योगातील मिळणारं अल्प उत्पन्नावर अवलंबून आहे. केंद्र सरकारने COPTA 2003 THE CIGARETTS AND (TOBACCO PRODUCTS ACT 2003) कायदातील तरतुदी नुसार बिडी ऊद्योग व या ऊद्योगावर अवलंबून असणारे करोडो कामगारांचे रोजगार धोक्यात आलेले आहेत. त्यामुळे जो पर्यंत पर्यायी रोजगार ऊपलब्ध होत नाहीत तोपर्यंत कोटपा 2003 कायदाची अंमलबजावणी करू नये अन्यथा लवकरच नवी दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य विडी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) ने जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे झालेल्या निदर्शनात दिला आहे.
बीडी ऊद्योग हा इतर तर तंबाखू ऊद्योगा पासून वेगळा करावा कारण हा ऊद्योग नैसर्गिक घटकां पासून केला जातो. या मध्ये कोणत्याही प्रकारची रसायने नसतात त्याच प्रमाणे परंपरागत घरगुती पध्दतीने बिडी वळण्याचे काम केले जाते. बिडी मध्ये तंबाखू चे प्रमाण अतिशय कमी असते. बिडी उत्पादन प्रकिये मध्ये वीजेचा वापर होत नाही, पर्यावरणाची हानी होत नाही मात्र अन्य तंबाखू ऊद्योग हे यंत्र सामग्री चा वापर करून चालवितात या मध्ये कांही हजार कामगारांना रोजगार मिळतो परंतु बिडी ऊद्योगावर करोडो कामगार अवलंबून असल्यामुळे बिडी ऊद्योग हा अन्य तंबाखू उत्पादना पासून वेगळा करण्यात यावा अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे.
बीडी कामगांरांना अन्य रोजगार उपलब्ध करून देण्यात सरकार अपयशी ठरले आहे त्यामुळे सर्व बिडी कामगारांचे रोजगार संरक्षित करण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
याबाबत चे निवेदन मा.पंतप्रधान भारत सरकार यांना जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या मार्फत देण्यात आले या वेळी मा. संदीपजी निचित अहमदनगर निवासी जिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकारले या वेळी महाराष्ट्र राज्य विडी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) भारतीय मजदूर संघांचे जिल्हाध्यक्ष श्री. संजय दुधाने ,उपाध्यक्ष श्री. सुजित उदरभरे सहचिटणीस श्री. अविनाश चारगुंडी व श्री.कृष्णा साठे ,संघटन सचिव श्री.नंदकुमार चिंतामणी, विशेष निमंत्रीत श्री. धनंजय तागडे व श्री प्रकाश नहार आदी भारतीय मजदूर संघ अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. निवेदन देतेवेळी अहमदनगर बिडी कारखानदार प्रतिनिधी श्री. स्वामी व आदी प्रतिनिधी उपस्थित होते.






