मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – चेन्नई -मंगलपूरम एक्सप्रेसमध्ये स्फोटकांचा साठा सापडला. केरळमधील कोजीकोड रेल्वे स्थनकावर ही ट्रेन आली असता १०० हून अधिक जिलेटीनच्या कांड्या, ३५० डेटोनटेर जप्त करण्यात आले. एका महिलेकडून हा साठा जप्त करण्यात आला असून तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

रमणी ऐसे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. चौकशी केली असता विहिर खोदण्यासाठीआपण ही स्फोटके नेत असल्याचे तिने सांगितले. रेल्वे पोलिस याप्रकरणी अधिक तापस करात आहेत.






