मुंबई (प्रतिनिधी) – शेअर बाजारामध्ये शुक्रवारी सकाळी व्यवहार सुरु झाला आणि १ हजारांहून अधिक अंकानी तो कोसळल्याचे चित्र पहायला मिळाले. जागतिक बाजारपेठेमधील घसरण या पडझडीला कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे.
सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी शेअर बाजार सुरु झाला तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील सेन्सेक्स ५० हजार १८४.६० वर होता. काल बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स ५१ हजारांवर होता. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्येही २८३.४५ अंकांनी पडला आणि १४.८३५.४५ वर स्थिरावला. कालच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये १.६८ टक्के तर एनएसईमध्ये १.८७ टक्क्यांची घसरण पहायला मिळाली.
ओपनिंग बेलपर्यंत सेन्सेक्स १ हजार अंकांनी घसरला आहे. आज संध्याकाळी शेअर बाजार बंद होईल तेव्हा निश्चित कळू शकेल की, तो नेमका किती अंकावर स्थिरावला आहे. आणि दिवसभरात किती अंकांची घसरण झाली.






