मुंबई (प्रतिनिधी) – मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेला असलेल्या बांगुर नगर परिसरात २४ फेब्रुवारी रोजी दिवसाढवळ्या सुर्या नावाच्या तृतीयपंथीयाची धारदार शस्त्राने आणि हातोडीच्या सहाय्याने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बांगुर नगर
पोलीसांनी ४ जणांना अटक केली आहे. मुंबई पोलीस झोन ११ चे डीसीपी विशाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली या हत्येचा तपास करण्यात आला आणि दोन दिवसात आरोपींना गजाआड करण्यात पोलीसांना यश आले.
या प्रकरणी ज्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. ते एकमेकांच्या ओळखीचे असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आणि सर्वजण जवळ जवळच राहणारे होते. आरोपी आणि तृतीयपंथी असलेल्या सुर्या यांच्यामध्ये दरवेळी छोट्या-छोट्या गोष्टीवरुन भांडणे होत होती. याअगोदर सुद्धा आरोपींनी अनेकवेळा सूर्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आणि प्रयत्न सुद्धा केला होता. मात्र योग्य वेळ आणि योग्य जागा सापडत नसल्यामुळे त्याची हत्या करता
येत नव्हती, अशी कबुली चारही आरोपींनी पोलिसांना दिली.
२४ फेब्रुवारी रोजी सुर्या एकटाच गोरेगाव लिंक रोडवर बसलेला होता. तेव्हा चारही आरोपी तिथे आले आणि त्यांनी चाकू व हातोड्याच्या सहाय्याने त्याची हत्या केली आणि पसार झाले. सुर्या हा तृतीयपंथीच्या एका समुहाचा गुरु होता. अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. स्थानिक नागरिकांची मदद करण्यासाठी सुर्या हा नेहमी पोलीस स्टेशनला येत असे. पकडण्यात आलेले चारही आरोपी हे कधीकाळी सुर्यासाठी सुद्धा काम करायचे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये एक आरोपी अल्पवयीन असून त्याचे वय १६ वर्ष आहे. राजेश रामकुमार यादव याचे वय २३ वर्ष आहे. तर दुसरा आरोपी विनय राजाराम यादव याचे वय २२ वर्ष आहे. आणि मुख्य आरोपी आसलेल्या धीरज रामशुभक विश्वकर्मा हा २१ वर्षाचा असून पोलीसांनी या सर्वांना कोर्टात हजर केले असता त्यांना न्यायालयाने २ मार्चपर्यत पोलिस कस्टडीची शिक्षा सुनावली आहे.







