यावल (तालुका प्रतिनिधी डॉ.मोहन साळुंके) – आज दि.27 फेब्रु.2021धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, मराठी विभागातर्फे मराठी राजभाषा दिवस ऑनलाइन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. मनोहर सुरवाडे यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केली. सदर कार्यक्रमाला प्रमुख वाक्त्या विभागातील ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ.सिंधुताई भंगाळे होत्या. त्यांनी आपल्या अतिशय रसाळ शैलीतुन मातृभाषा मराठीचे आपल्या जीवनातील स्थान, महत्त्व, उपयोगिता विविध संयुक्तिक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. त्यांनी आपल्या मनोगतातून ज्ञानेश्वरांपासून तर वि वा शिरवाडकर पर्यंतच्या संत पंत व तंत लेखकांनी मराठी भाषा कशी समृद्ध केली. आपल्या माय मराठीचा गोडवा अमृतापेक्षा ही गोड आहे. म्हणून मराठी बोलताना कोणीही कमीपणा मानून घेऊ नये. जास्तीत जास्त मराठीतून संवाद साधावा असे आवाहन या निमित्ताने केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शरद बिराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी केले. सदर कार्यक्रमाला प्राध्यापक सुजाता भंगाळे, प्रा. डॉ.राजेंद्र राजपूत तसेच मराठी विभागाचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






