नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – कामगार राज्य विमा योजना रुग्णालयातील सेवा निवृत्त रक्तपेढी विभागाचे तंत्रज्ञ व आयोजक तसेच रक्तदान सहाय्य केंद्र या नोंदणीकृत संस्थेचे संस्थापक रक्तदानाचे प्रणेते श्रीधर बुधाजी देवलकर यांनी मीरारोड येथे रविवार दिनांक २१ /२/२०२१ रोजी सकाळी ९ ००ते १ ०० या वेळेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून कोरोना विषाणूची बाधा झाल्यास बाधित रुग्णांस तत्काळ रक्तकुपी उपलब्ध झाली पाहिजे या रुग्ण हिताच्या दृष्टीने तसेच आरोग्य मंत्री ब मुख्यमंत्री यांचे रक्तदान शिबिर आयोजनाचे आवाहन करण्यापूर्वीच तातडीने स्वेच्छा रक्तदान शिबिर आयोजित करून 70 रक्तकुप्या जमा करून१२५ वे स्वेच्छा रक्तदान शिबिर यशस्वी केले.
श्रीधर बुधाजी देवलकर हे गेली ३० वर्षे स्वेच्छा रक्तदानाचे कार्य आपली शासकीय सेवा सांभाळून आपल्या मासिक वेतनातून करीत आहेया स्वेच्छा रक्तदान शिबिराचे वैशिष्ठ असे होते की, सामाजिक अंतर, मास्क अनिवार्य आणि सानिटायझर हे नियम पाळून हे शिबिर यशस्वी करण्यात आले. मी जबाबदार हे मुख्यमंत्री यांनी घोषवाक्य जाहीर केले पण देवलकर यांनी कोरोनाबाधित रुग्णांकरीता स्वेच्छा रक्तदान शिबिर आयोजित करून मी जबाबदार, माझी जबाबदारी हे कृतीने दाखवून दिले आहे.






