मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – ऑनलाईन नोंदणी झाल्यावर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. यामध्ये लस घेण्याची तारीख, ठिकाण आणि वेळ याविषयी माहिती देण्यात येणार आहे.
कोरोना वक्सीनशन : देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू होत आहे. या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि आजारी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या नागरिकांना लसीसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.
लसीकरण सरकारी रुग्णालये तसेच काही निवडक रुग्णालयात होणार आहे. लसीकरणासाठी सोमवार १ मार्चपासून कोविड प्लॅटफॉर्मवर नोंदणी सुरू होणार आहे. सरकारने लसीकरणासाठी १० हजार शासकीय आरोग्य केंद्रे निश्चित केली आहेत. तेथे ही लस विनामूल्य दिली जाईल. या व्यतिरिक्त खरेदी करूनही लस घेतली जाऊ शकते.






