पुण्यात पीएचडी करणाऱ्या तरूणाचा गळा चिरून खून

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पाषाण येथील प्रसिध्द नॅशनल केमीकल लॅब्रॉटरी (एनसीएल) येथे डॉक्टरेट करत असलेल्या विद्यार्थ्याचा धारदार हत्यारांनी गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याचबरोबर पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा दगडाने ठेचून मृतदेह सुस येथील खिंडीत टाकण्यात आला.

सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडित (३०, रा. शिवनगर, सुतारवाडी मुळ रा. मु. जानेफळ (पंडीत) ता. जाफराबाद, जि. जालना) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत त्याचा चुलत भाऊ संदीप पंडित (३४, सुतारवाडी, पाषाण, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप पंडित हे मागील काही वर्षापासून पुण्यातील सुतारवाडी परिसरात राहण्यास आहेत. तर मृत सुदर्शन हा पुण्यातील पाषाण येथील प्रसिध्द नॅशनल केमीकल लॅब्रॉटरी (एनसीएल) रसायन शास्त्र विषयात पीएचडी करण्यासाठी दीड वर्षापूर्वी पुण्यात आला होता. तो सुतारवाडी परिसरात पेईंग गेस्ट स्वरूपात राहत होता. शनिवारी एकाचा मृतदेह सुसखिंडीत पडला असल्याची माहिती सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलिस कन्ट्रोल रूमला मिळाली. त्यानुसार सकाळी लवकरच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुदर्शनच्या अंगावरील कपडे काढून त्याच्या गळ्यावर वार करून व ओळख पटू नये यासाठी चेहरा विद्रुप करण्यासाठी दगडाने ठेचण्यात आला होता.

दरम्यान, मृतदेहाची ओळख पटण्यासाठी मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांची तपासणी केल्यानंतर पोलिसांना त्याच्या पॅन्टीच्या खिशात पाकीट आढळले. पाकिटात आधार कार्ड होते. त्याच आधार कार्डच्या आधारे पोलिसांना सुदर्शनच्या भावा विषयी माहिती समजली. त्याच्या भावाकडील चौकशीत सुदर्शन हा दीड वर्षापूर्वी पुण्यात पीएचडीचे शिक्षण घेण्यासाठी आला असल्याचे समजले. परंतु, त्याचा खुना मागचे कारण समजु शकले नसून पोलिस त्याचा तपास करत आहेत. गुन्ह्याचा तपास गुन्हे निरीक्षक गायकवाड करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here