जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – शहराचे आमदार आणि भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांना कोरोना झाला असल्याने त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याला त्यांनी दुजोरा दिला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशान्वये रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांना रात्री १० वाजेच्या आत दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास तीन दुकानांवर कारवाई केली असून चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.






