अमरावतीत पुन्हा 7 दिवस लॉकडाऊन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अमरावती – जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पुन्हा 7 दिवसांपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याबाबतचा आदेश शनिवारी दुपारी जारी केला असून विशेषतः अमरावती शहर, अचलपूर व अंजनगाव सुर्जी येथे हा लॉकडाऊन अधिकच कडक राहणार आहे.

अंजनगाव सुर्जी शहर कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहणार आहेत. भाजी बाजार भरविण्यासंदर्भात वेगवेगळे दिवस जारी करण्यात येणार आहे. नव्या आदेशानुसार अंजनगाव सुर्जी शहर व आसपासच्या परिसरात लॉकडाऊन सुरू राहणार आहे.

गेल्या आठ दिवसात कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्याचा निर्णय 22 तारखेलाच घेण्यात आला होता. हा निर्णय 1 तारखेपर्यंत होता. परंतु रूग्णांची संख्या वाढतच आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या दोन दिवसापासून सरासरी 8 रूग्ण कोरोनामुळे दगावत आहे. सध्या मृतांची संख्या 495 झाली आहे. त्यामुळे अमरावतीत आणखी 7 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 7 मार्चपर्यंत लागू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here