पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहाजवळ आढळला किंग कोब्रा

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी मुलांच्या वसतिगृहाजवळ आढळलेल्या ‘किंग कोब्रा’ ला विद्यापीठाचे सुरक्षारक्षक सुनील माळी यांनी रेस्क्यू केलं आहे. माळी यांनी या किंग कोब्राला पकडून सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडलं आहे.

शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुलांचे वसतिगृह क्रमांक 9 येथील केबिनमध्ये नाग आढळल्याचे वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच ही बाब सुरक्षा विभागाला कळवली. सुरक्षा विभागातील सुरक्षारक्षक सुनील माळी हे साप व नाग पकडण्यात तरबेज असल्याने ही बाब त्यांना कळवण्यात आली. त्यांनी पुढील वीस ते पंचवीस मिनिटांत त्या नागाला योग्य प्रकारे पकडलं आणि सुरक्षित स्थळी सोडले.

या किंग कोब्राबद्दल माहिती देताना माळी म्हणाले, हा नाग सहा फुटी असून त्याचे वजन साधारण साडेचार किलो होते. सुनील माळी यांनी आतापर्यंत 200 हून अधिक साप व नाग पकडले आहेत. दरम्यान माळी यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सुरक्षा विभागाचे संचालक सुरेश भोसले तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here