भोगनीपूर पोलीस स्टेशन क्षेत्रात ट्रॉली पलटल्याने ६ मजूरांचा जागीच मृत्यू ; ८ गंभीर

कानपुर देहात (उत्तर प्रदेश) – भोगनीपूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील मऊ मुगलपूर रोडवर ट्रॉली पलटल्याने ६ मजूरांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे तर ८ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात ओव्हरलोडिंगमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बरनाव गावातील निवासी असलेले एका ट्रॉलीमध्ये रामखिलावन यांची मुलगी चंन्दावती (१४), अरविंद (२५), रमेश (४५), नर्वेश (१८), अमरसिंह यांची मुलगी नीलम (१७), मुलगा ध्रुवकुमार (१३), सभाजीत (१०), जगन्नाथ यांची मुलगी सोनी (१५), मानसिंह यांची पत्नी पिंकी (४५), पच्चो (१८), हमीरपूर येथील कलौलीतीर येथील निवासी लालाराम (३९), रज्जनदेवी (४०), सुमित्रा (६), शिवप्यारी (५५), शिवलाल (७०), बदरा गावातील विमलादेवी (४२), राधा (४२), कोमल (९), सुरज (५) आदी मजूर बटाट्याच्या शेतातील कामासाठी इटावाला निघाले होते. तेव्हा मऊ मुगलपूर रोडवर ही ट्रॉली पलटली.

या अपघातात ६ मजूरांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा अपघात ओव्हरलोडिंगमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघात झाल्यानंतर या रस्त्यावरिल वाहतूक काही वेळ खोळंबली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here