गुवाहाटी (आसाम) – आसाममधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी वड्रा यांच्या आसाम दौर्याचा आज दुसरा दिवस आहे. प्रियांका राज्यात निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करीत आहेत. यावेळी, त्या वेगवेगळ्या लोकांनाही भेटत आहेत. मंगळवारी त्या तेजपूरमध्ये एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. जाहीर सभेच्या अगोदर प्रियंका महिला चहा बाग कामगारांना भेटल्या. त्यावेळी त्यांची एक वेगळीच छबी उपस्थितांना दिसली.
कॉंग्रेस नेत्यासह अन्य कार्यकर्त्यांनी विश्वनाथमधील सद्गुरूच्या चहा बागेत चहाची पाने तोडली. ते ही महिला कामागारांप्रमाणे डोक्यावर टोपली घेऊन. यावेळी या मजुरांशी चर्चा करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, आसाममधील चहा बाग कामगारांच्या प्रश्नांचा मोठा विषय आहे.
Smt. @priyankagandhi joins tea workers at Sadhuru tea garden and tries her hand at plucking tea leaves. pic.twitter.com/3qFtbGkESF
— Congress (@INCIndia) March 2, 2021
मजुरांशी भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, ‘आसामची बहु-रंगीत संस्कृती ही आसामची शक्ती आहे. माझ्या आसाम भेटीदरम्यान मला वाटलं की ही बहुरंगी संस्कृती वाचवण्यासाठी लोक पूर्ण वचनबद्धतेने तयार आहेत. आसाममधील लोकांची संस्कृती आणि वारसा वाचविण्यासाठी त्यांच्या संघर्षात कॉंग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी आहे.






