खंडवा येथील भाजपचे खासदार नंदकुमार सिंह चौहान यांचं निधन

खंडवा (मध्यप्रदेश) – येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार नंदकुमार सिंह चौहान यांचे आज दि.२ मार्च रोजी गुडगाव मेदांता रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाने मध्यप्रदेश भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का पोहोचला असून त्यांच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर एकच शोककळा पसरली आहे .

नंदकुमार सिंह चौहान हे गेल्या एक महिन्यापासून गुडगाव येथील रुग्णालयात उपचार घेत होते . तत्पुर्वी ११ जानेवारी रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना भोपाल येथे ऍडमिट करण्यात आले होते .परंतु त्यांची प्रकृती जास्तच खालावली गेल्याने त्यांना गुडगाव येथे दाखल करण्यात आले होते आज उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here