लाडक्या घोड्याच्या वाढदिवसाला २५ किलोचा केक

सहरसा (बिहार) – येथील एका घोडय़ाच्या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घाललाय. या फोटोमध्ये घोडय़ासमोर चक्क भलामोठा केक दिसतोय. गंमत म्हणजे हा फोटो आहे याच घोडय़ाच्या बर्थडे पार्टीतील आहे.

इथल्या पंचवटी चौकातील रजनीश कुमार ऊर्फ गोलू यादव या तरुणाने आपल्या लाडक्या चेतकचा दुसरा वाढदिवस मोठय़ा धूमधडाक्यात साजरा केला. चेतकच्या वाढदिवसासाठी खास 25 किलोचा केक ऑर्डर करण्यात आला होता. एवढंच नाही तर, चेतकला छान सजवण्यात आले होते.

याबाबत गोलू म्हणाला, चेतक हा आमच्या परिवारातील सदस्याप्रमाणे आहे. गेल्या वर्षीदेखील आम्ही त्याचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला होता. मुक्या प्राण्यांनादेखील संवेदना असतात, त्यांच्यावर प्रेम करा हा संदेश मला या माध्यमातून द्यायचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here