महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना कोरोनाची लागण

सिध्दाराम म्हेत्रे यांच्या आरोग्यासाठी युवक काँग्रेसची प्रार्थना

अक्कलकोट (तालुका क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) –  महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम सातलींगअप्पा म्हेत्रे यांना कोरोनाची लागण झाली. याबाबत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हेत्रे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले,व कार्यकर्ते व खंदे समर्थक चिंताग्रस्त झाले. त्यांच्यावर सध्या उपचार चालु असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.

सिद्धाराम म्हेत्रे लवकर बरे व्हावे यासाठी मैंदर्गी शहर युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने मैंदर्गीचे ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर मंदिर व हजरत गैबी पीर दर्गा येथे आरती व प्रार्थना करण्यात आली. त्यांच्या प्रकृती स्वास्थासाठी साकडे घालण्यात आले.

याप्रसंगी काँग्रेसचे कार्यकर्ते सागर भिंगोळी,संजय चांभार,सिधु मेंते, गजानन दिवटे,इमरान तडमुड,प्रकाश चौगुले,सिदु काळी, नितीन करजगी,किरण लोणी,मोसीन नदाफ, सिदार्थ पाटील, मोहन दिवटे, व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

shivchaleshwar-mandir
मैंदर्गीचे ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर मंदिर

 

hajarat-gaibi-peer-dargah
हजरत गैबी पीर दर्गा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here