आग्रा (उत्तर प्रदेश) – येथे ताजमहलमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली. एका व्यक्तीचा कॉल आल्यानंतर पर्यटकांमध्ये एकच गोंधळ उडाला. परंतु, ही खोटी माहिती असल्याचे समजताच सर्वांचा जीव भांड्यात पडला आणि पुन्हा ताजमहल पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.
ताजमहल येथे बॉम्ब असल्याचे कॉल येताच सीआयएसएफने ताजमहलधून अचानक पर्यटकांना बाहेर काढले. यावेळी पर्यटक आणि सीआयएसएफ यांच्यात वादही झाला होता.
फोन पर #ताजमहल को बम से उड़ाने की सूचना के सम्बन्ध में ए0डी0जी0,आगरा रेंज आगरा @SatishBharadwaj द्वारा बताया ताजमहल में चैकिंग के दौरान स्थिती सामान्य पाई गयी है, पर्यटकों के लिये ताजमहल को पूर्व की भाँति खोल दिया गया है, इस सम्बंध में दी गयी बाईट। @Uppolice @adgzoneagra @dgpup pic.twitter.com/M3Qdttyc4z
— IG Range Agra (@igrangeagra) March 4, 2021
असं म्हटलं जातं की, कोणा एका व्यक्तीने पोलिसांना फोन ताजमहलमध्ये बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. ताजमहलजवळ बॉम्ब ठेवण्यात आला आहे, काही वेळानंतर स्फोट होईल, अशी सूचना फोनवरून पोलिसांना देण्यात आली. यानंतर तत्काळ पोलिस ताजमहल बाहेर पोहोचले. ताजमहलचे दोन्ही गेट बंद करण्यात आले आणि पर्यटकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ताजमहलच्या बाहेर पोलिस आणि आतमध्ये सीआयएसएफकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले.
ताजमहलमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर शोध सुरू करण्यात आला. परंतु, कुठेही बॉम्ब मिळाला नाही. आग्राचे आयजी यांनी सांगितले की, बॉम्ब असल्याचे वृत्त खोटे आहे. लोकांनी चिंता करू नये. फिरोजाबादमधून एका माथेफिरूने फोन करून बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली होती. आरोपीला पकडण्यात आले.






