लग्नाच्या आमिषाने तोतया पोलिसाचा महिलेवर अत्याचार

राहता (अहमदनगर) – लग्नाचे आमिष दाखवून तोतया पोलिसाने महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या तोतया पोलिसाने शिर्डी येथे पोलीस असल्याचे भासवून शिर्डी येथील महिलेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली.

पोलीस भरतीत मदत करतो असे सांगून तोतया पोलीसाने तिच्याशी शारीरीक संबध जोडून लग्न करतो असे सांगीतले. मारहाण करत तिची फसवणूक केल्या प्रकरणी तोतया पोलीसाविरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

बीड येथील हिवराफाडी येथील किरण महादेव शिंदे याने शिर्डी येथील महीलेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख होवून मैत्री केली. तसेच पोलीस असल्याचे बनावट आयकार्ड व फोटो दाखवत शिर्डी पोलीस ठाण्यात नोकरीस असल्याचे भासवून तिच्याशी घसरट वाढविली. तुला पोलीस भरतीत मदत करतो, तु नवऱ्याला सोडून, दे माझ्याशी लग्न कर असे सांगून तिच्याशी शारीरीक संबध ठेवले. नंतर तो तोतया पोलीस असल्याचा फिर्यादीला संशय आल्याने तिने त्यास विचारणा केली असता महिलेस लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर राहाता पोलीसात महिलेने फिर्याद दिली. तिची फिर्याद नोंदवून घेत पोलीसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याची झाड झडती घेतली असता त्याच्याकडे बनावट पोलीसाचे आयकार्ड, पोलीस ड्रेस व फोटो सापडले. या प्रकरणी तोतया पोलीसाच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत कंडोरे हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here