३२ मण सुवर्णसिंहासन खडा पहारासाठी प्रत्येक तालुक्याने चार धारकरी पाठवावे – संभाजीराव भिडे गुरुजी

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय निकम) – येथील सदिच्छा भेटीत संभाजीराव भिडे गुरुजी मोजक्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. त्यांनी धर्मवीर संभाजी महाराजांना कशा क्रूर पध्दतीने हालहाल करून मृत्यूमुखी पाडले, याचे वर्णन सांगून बलिदान मास प्रत्येक घराघरात साजरा झाला पाहिजे. तसेच रायगडावर तयार होणार्‍या ३२ मण सुवर्ण सिंहासनासाठी जागता खडा पाहर्‍यासाठी तरुणांनी पुढे यावे व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास हिंदूंनी पालन करावे असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संभाजीराव भिडे गुरूजी यांनी केले.

यावेळी भिडे गुरुजी यांनी अरिहंत गौशाळा याठिकाणी सदिच्छा भेट दिली. गौशाळेचे व्यवस्थापन बघून त्यांनी सर्व गौभक्त यांचे कौतूक केले आणि महाराष्ट्र शासन ज्याप्रमाणे संजय गांधी निराधार योजना राबवते त्याप्रमाणे गौमातेसाठी ही अनुदान योजना महाराष्ट्र शासनाने राबवावी यासाठी मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री यांच्या बोलणार असल्याचे गौसेवक यांना सांगितले. यावेळी ते हिंदु सेवा सहाय्य समितीच्या कार्यालय तसेच धारकरी नरेंद्र पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली असता हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील,

रायगडावर निर्माण होणार्‍या ३२ मण सुवर्ण सिंहासनासाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून ४ शिवभक्त धारकरी यांची नोंदणी करा असे मार्गदर्शन धारकरींना केले. मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत, सुमित परदेशी, कपिल चौधरी, पंकज डाबी यांनी भिडे गुरुजी यांना राजे शिवछत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा सत्य इतिहास व्याख्यानाचा माध्यमातून नंदुरबारकरांना सांगावा यासाठी लेखी निमंत्रण दिले. ते त्यांनी स्विकारून लवकरच तारीख कळवणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here