ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मुरबाड येथील भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिली आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात धनंजय मुंडेंवरील आरोपनंतर पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच भाजप नगरसेवकाच्या अटकेचे वृत्त समोर आले आहे.
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांना आवर घालण्यापेक्षा सत्तारूढ पक्षाने आपल्याच सहकारी पक्षाची कोंडी केली आहे. विशेषतः विरोधकांना उत्तर देण्याच्या नादात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनी काँग्रेसची कोंडी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात राज्यपाल 12 आमदार देणार नाही तोपर्यंत मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळ आम्ही देणार नाही, असे विधान करून काँग्रेसची मोठी अडचण केली.






