बोरगाव दे. येथे सी. सी. टी. व्ही. लोकार्पण सोहळा उत्साहात
सी. सी. टी. व्ही., घंटागाडी, ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे आकाशवाणी बातम्या आदी उपक्रम राबवणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत.
अक्कलकोट (तालुका क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – सरपंच काय करू शकतो हे बोरगाव च्या सरपंचाचे कार्य पाहिल्यानंतर लक्षात येते. शासनाच्या सर्व योजना राबवून विकासकामे करताना गावातील प्रमुख चौकांमध्ये सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवून गाव डिजिटल आणि टिपिकल बनवणार्या बोरगाव ग्रामपंचायतीचा आदर्श तालुक्यातील नवनियुक्त सरपंचानी घ्यावा असे आवाहन उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कलाप्पा पुजारी यांनी केले.
बोरगाव दे. येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रमुख चार चौकात बसवण्यात आलेल्या प्रत्येकी दोन याप्रमाणे आठ सी. सी. टी. व्ही. कॅमेर्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच विलासराव सुरवसे हे होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे, उपसरपंच राजेभाई मुजावर, पोलीस हवालदार अंगद गीते, विपीन सुरवसे, माणिक बिराजदार, उपस्थित होते.
प्रारंभी प्रा. प्रकाश सुरवसे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने मागील तीन वर्षात झालेल्या आणि सध्या कार्यरत असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. यावेळी बोलताना पुजारी म्हणाले, सी. सी. टी. व्ही. यंत्रणा कार्यान्वित करणारी बोरगाव दे. ही तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत असून या नव्या यंत्रणेमुळे पोलीस प्रशासनाला मोठी मदत होणार आहे. यामुळे गावाला डिजिटल स्वरूप प्राप्त होणार असल्याचे सांगितले. 
राष्ट्रवादी चे अध्यक्ष दिलीप सिध्दे म्हणाले, सरपंच सुरवसे यांनी मागील तीन वर्षात विकासकामाचा डोंगर उभा केला आहे. गावच्या भल्यासाठी तळमळीने धडपडणारा सरपंच म्हणून तालुक्यात त्यांना मान्यता मिळत असून यापुढेही त्यांच्या विकासमय वाटचालीस सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमात कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण भैरामडगी, वाहिद वळसंगकर, विजयकुमार खोबरे, अनिल दूधभाते, पोलीस पाटील अभिजित पाटील, इब्राहिम कारंजे, स्वरांजली बिराजदार, सुलोचना गवी, शैदुनिस्सा जमादार, अनामिका देशेट्टी, ग्रामपंचायत सदस्य राजेभाई बागवान, महेश हत्तरके, महंमद पठाण, श्रीकृष्ण मगर, नवाज खडकाळे, माणिक बिराजदार, सुभाष धनशेट्टी, अल्लाउददीन गवंडी, भीमशा हत्तरके, सुभाष पवार, अमीन मुजावर, गुंडू बागवान, योगीराज सिध्दे, सुनील सुरवसे, सचिन जिरगे, भागेश जिरंगे, विठ्ठल कोळी, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
मागील तीन वर्षात झालेली कामे
आरोग्य उपकेंद्र – रु. 65 लक्ष.
सिमेंट काँक्रेट रस्ते – रु. 60 लक्ष
पेवर ब्लॉक – रु. 7 लक्ष.
ग्रामपंचायत कार्यालय फर्निचर – रु. 1 लक्ष.
हायमास्ट दिवा – 1.5 लक्ष.
कचरा संकलन घंटागाडी – भाडेतत्वार.
ध्वनिक्षेपक यंत्रणा – आकाशवाणी बातम्या, कृषी वार्तापत्र.
जलशुद्धीकरण यंत्र – 2.50 लक्ष.
जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती – रु. 6 लक्ष.
जि. प. शाळेत प्रत्येक वर्गासाठी डिजिटल टी. व्ही.,
प्रत्येक वर्गात साउंड सिस्टिम.पाणी शुद्धीकरण संयंत्र. – रु. 5 लक्ष.
दोन अंगणवाडी दुरुस्ती – रु. 2 लक्ष.
मातंग वस्ती समाज मंदिर – रु. 7 लक्ष.
मातंग वस्तीत पाणी टाकी -रु. 1 लक्ष
सी. सी. टी. व्ही. यंत्रणा – रु. 1 लक्ष.
सुरु असलेली कामे
पाणीपुरवठा योजना – रु. 1 कोटी
जि. प. शाळा क्रिडांगण सुशोभीकरण, स्टेज, गेट, कंपाउंड, स्वच्छतागृह – रु. 7 लक्ष.
भूमिगत गटार – रु. 2 लक्ष.
अनुसूचित जाती समाजमंदिर दुरुस्ती – रु. 2.50 लक्ष.
अनुसूचित जाती वस्तीत सार्वजनिक महिला स्वच्छतागृह – रु. 2 लक्ष.
नियोजित/प्रस्तावित कामे
पशुवैद्यकीय दवाखाना – रु. 35 लक्ष
मुस्लिम अल्पसंख्यांक शादीखाना सभागृह – 20 लक्ष.
व्यापारी गाळे, बाजार कट्टे – रु. 25 लक्ष
धनगर वस्ती बिरोबा समाज मंदिर – 7 लक्ष.
हायमास्ट दिवे 4 – रु. 6 लक्ष.
भूमिगत गटार योजना – रु. 10 लक्ष.
सिमेंट रस्ते पेवर ब्लॉक – रु. 30 लक्ष.
सार्वजनिक वाचनालय इमारत रु. 7 लक्ष.
तीर्थक्षेत्र विकास निधी – रु. 1.5 कोटी.
नवीन कचरा संकलन घंटागाडी -रु. 5 लक्ष.
पीर राजेबकसार पर्यटन विकास – रु. 50 लक्ष.
सांस्कृतिक सभागृह -रु. 30 लक्ष.
वेशीसमोरील ओढ्यावर पूल बांधकाम – रु. 40 लक्ष.






