दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीने केला पत्नीचा खून

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – पालघर जिल्ह्यातील तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली. दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीने पत्नीची चाकूने वार करून हत्या केली. शिर्डी नगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे.

पालघर जिल्ह्यातील शिर्डी नगर परिसरात ३ मार्च रोजी ही घटना घडली. पत्नीने दारू खरेदीसाठी पैसे देण्यास नकार दिला. यावरून आरोपी पतीने तिची हत्या केली. तुळिंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी आरोपी रुपेश मोरे याने आपल्या ३० वर्षीय पत्नीवर चाकूने वार केले. त्यानंतर लोखंडी सळईने तिच्यावर प्रहार केले. वनिता मोरे असे महिलेचे नाव आहे.

घटनेच्या दिवशी पीडितेच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारील उमेश जाधव हे त्यांच्या घरी धावत आले. वनिता या रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्या होत्या. त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर जाधव याने तात्काळ पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तुळिंज पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीला गुरुवारी अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here