मुंबई (हितेश मिस्त्री) – कोरोनाच्या लढाईत मुंबई पोलिस हे सध्या फ्रंटलाईनवर उभे राहत कोविड 19 चा मुकाबला करत आहेत. लोकांशी थेट संपर्क असल्यामुळे पोलिस दलात मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झालेली आहे. तसेच काही पोलिसांना यात आपला जीवही गमवावा लागला. खबरदारीचा उपाय म्हणून वय जास्त आणि इतर शारिरीक आजार असलेल्या पोलिसांना ड्युटीवर येण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पोलिस दलावर अतिरीक्त ताण पडू नये म्हणून अनेक निलंबित पोलिसांना पुन्हा ड्युटीवर बोलावण्यात आलं आहे. असे या प्रतिज्ञापत्र स्पष्ट केले आहे.
ख्वाजा युनूसच्या कथित मृत्यूप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे आणि हवालदार राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम या चौघांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले. या चारही पोलिसांची पुन्हा नियुक्ती हेतुपूरक करण्यात आली आणि एप्रिल 2004 मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान केल्याचा दावा ख्वाजा युनूसची आई असिया बेगम यांनी वरिष्ठ अॅड. मिहीर देसाई यांच्यामार्फत केला. त्यांनी पोलिस आयुक्त परम बीर सिंह यांच्या विरोधात अवमान याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेसंदर्भात राज्य सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.







