१४ वर्षाच्या मुलावर बलात्कार करणारी महिला झाली गर्भवती

अर्कान्सास (अमेरिका) – येथे एका १४ वर्षाच्या मुलावर बलात्कार करणारी महिला आता गर्भवती असून, ती मुलालाच जन्म देणार आहे. अमेरिकेतील द सन वृत्तपत्राने या घटनेबद्दल वृत्त दिलं आहे. या महिलेला १४ वर्षाच्या मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ही घटना एका वर्षापूर्वी घडली होती. साक्षीदाराने पोलिसांना सांगितलं की, पीडित मुलामुळे महिला गर्भवती राहिली आहे. ब्रिटनी ग्रे असं या महिलेचं नाव आहे.

बलात्काराची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. ब्रिटनी ग्रे ही महिलेचे एका १४ वर्षाच्या मुलासोबत शारीरिक संबंध असल्याचं एका व्यक्तीने राज्य बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक विभागाला सांगितलं होतं. त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्या दोघांना शारीरिक संबंध ठेवत असताना आपण प्रत्यक्ष बघितलं असल्याचं साक्षीदाराने पोलिसांना सांगितलं होतं.

आता त्याच साक्षीदाराने ग्रे गर्भवती असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. तिला पीडित मुलापासून दिवस गेले असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. साक्षीदाराने दिलेल्या माहितीची पोलिसांनी पडताळणी केली. तेव्हा ब्रिटनी ग्रे ही महिला गर्भवती असल्याचं समोर आलं, असं वृत्तात म्हटलं आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी घटनेच्या एका वर्षानंतर म्हणजे १ मार्च रोजी अटक केली. गुरुवारी तिची जामीनावर सुटका करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here