नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिंगनाबोडी गावात चुलत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. ही घटना ३ मार्च रोजी सकाळी ११च्या सुमारास घडली.
याप्रकरणातील १० वर्षीय पीडित मुलगी ही त्याची सख्खी चुलत बहीण आहे. रमेश खासगी कंपनीत नोकरीला आहे तर पीडित मुलगी इयत्ता ५ वीची विद्यार्थिनी आहे. हे दोघेही शेजारीच राहतात.
त्याने ३ मार्च रोजी पीडित मुलीला ब्लेड आणायला पाठविले. तिने ब्लेड आणल्यानंतर त्याने तिला घरात बोलाविले व तिचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे






